मराठी कादंबरीकार स्व. शिवाजी गोविंदराव सावंत.
संपूर्ण महाभारताचा वेध घेणारी आणि आजच्या वाचक पिढीला थेट कुरूक्षेत्रावर नेणारी ‘मृत्यूंजय’ ही कादंबरी त्यांनी वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी लिहिली.
त्या कथेची हिंदी, मल्याळम, कन्नड, गुजराथी, बंगाली, तेलुगू, उडिया या भाषांत भाषांतरे झाली. अशी स्थल, काल, भाषेच्या मर्यादा ओलांडून गेलेली ही मराठीतील पहिली कादंबरी!
दानशूर कर्णावरील मृत्युंजय या कादंबरीनंतर त्यांनी लिहिलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील कादंबरी (छावा) आणि विविध पैलूमय जीवन लाभलेल्या व भारतीयांना सदैव प्रेरक आदर्श असलेल्या योगयोगेश्वर श्रीकृष्णाच्या चरित्रग्रंथावर ‘युगंधर’ या दोन कादंबऱ्या सुप्रसिद्ध झाल्या.