मराठी कवी, विचारवंत, दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक कै. नामदेव लक्ष्मण ढसाळ. नामदेव ढसाळ हे साठोत्तरी मराठी कवितेतील एक प्रतिभाशाली कवी होते.
आपल्या विशिष्ट शैलीने मराठी कवितेच्या परंपरेत मोलाची भर घालणारे आणि भाषिकदृष्टया प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरून मराठीला समृद्ध करणारे साहित्यिक होते. त्यांच्या लिखाणावर लघुनियतकालिकांचा, मनोहर ओक यांचा तर काही प्रमाणात दिलीप चित्र्यांचा प्रभाव दिसतो. त्यांच्या कृतींमध्ये वेदना,विद्रोह आणि नकार हा स्थायीभाव आहे. नामदेव ढसाळ यांना ” महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार “, ” सोविएट लँड नेहरू ऍवॉर्ड “, भारत सरकारचा ” पद्मश्री पुरस्कार ” तसंच “साहित्य अकादमीचा गोल्डन लाईफटाइम अचिव्हमेंट अॅवॉर्ड ” हा पुरस्कार प्राप्त करणारे ढसाळ देशातले एकमेव कवी आहेत.
Advertisement