मना वासना दुष्ट कामा ना ये रे ।
मना सर्वथा पाप बुद्धी नको रे ।।
मना धर्मता नीति सोडूं नको हो ।
मना अंतरी सार विचार राहो ।।४।।
रे मना, दुष्ट इच्छा मुळीच उपयोगाची नाही. पापी विचार सुद्धा मुळीच असू नये.
धर्माने व नीतीने वागणे सोडू नको. मना हा श्रेष्ठ विचार अंतःकरणात जपून ठेव.