जनीं सर्व सुखी असा कोण आहे ।
विचारें मना तूंचि शोधूनि पाहें ।।
मना त्वांचि रे पूर्वसंचित केलें ।
तयासारिखें भोगणे प्राप्त झाले ।।११।।
या जगात, सर्व लोकांमध्ये सर्व, काळ व सर्वप्रकारे सुखी कोणी आहे का याचा हे विचार करणाऱ्या मना तूच शोध घे. तुलाच उमगेल कि सर्व सुखी असा कोणीही नाही.
विवेकी, विचारी मन सुखी असू शकते. त्याचप्रमाणे तुला असेही दिसेल की आपल्याला जे भोगावे लागते ते आपल्या पूर्वसंचिताचे फळ असते.
Advertisement