जीव कर्मयोगें जनीं जन्म जाला ।
परी शेवटी काळमूखीं निमाला ।।
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ।।१४।।
मना, जन्माचे कारण काय तर आपले पूर्व कर्म व जन्म संपण्याचे कारण काय तर ‘काळ’. जीवन हे जन्म मृत्यूचा एक खेळ आहे, साखळी आहे. लहानमोठा असा भेद नाही. मोठे थोरसुद्धा मृत्यू मार्गाचेच वाटसरु असतात. जे मन हे वास्तव स्वीकारते ते सामर्थ्य संपन्न होते. त्यालाच जन्म मृत्यूच्या पलीकडे पाहण्याची शक्ती येऊ शकते.