निसर्गाची देणगी

लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित

सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प

मालिनी आणि सुधाकर एक सुखी जोडपं. दहा वर्षे लग्नाला पूर्ण झालेली. परंतु पोरंबाळं नाहीत हीच एक उणीव. मालिनीला लहान मुलांचा फार लळा होता. दत्तक घ्यायचा विचार दोघांच्या मनात पण तो फक्त विचार, प्रत्यक्ष कृतीत त्यांनी ते अजून केलं नव्हतं. मालिनीला सतत कुठल्या ना कुठल्या विषयावर बोलण्याची फार सवय होती आणि सुधारला त्या गोष्टीची सवय होती. तो फक्त ऐकून घ्यायचं सोपं काम करत होता. कुठल्या गोष्टीला नुसतं हं करायचं, कधी प्रश्न विचारायचा, कुठे होकार द्यायचा हे त्याला आता पक्कं ठाऊक झालं होतं.

दोघेही आपल्या गाडीने मालिनीच्या गावी म्हणजे कराडच्या दिशेने जात होते. सुधाकर पहिल्यांदाच या भागात आला होता कारण मराठी भाषिक असला तरी लहानपणापासून तो उत्तर भारतात वाराणसी येथे वाढलेला होता त्यामुळे मालिनीच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याबद्दल त्याला कल्पना नव्हती. ३० वर्षांनी मालिनी आपल्या गावी येत होती त्यामुळे रस्त्यांचे झालेला विकासाबद्दल ती सतत काही ना काही बडबडत होती. जुन्या रस्त्यांबद्दल सांगत होती. आता हिचं हेच जुनं पुराण चालू राहणार त्यामुळे सुधाकरने तिच्या बोलण्याकडे लक्ष न द्यायला सुरुवात केली आणि गाडी चालवण्यात दंग झाला. इतक्यात मालिनी किंचाळली आणि म्हणाली, अहो हे काय? लक्ष कुठे आहे तुमचं? आपण रास्ता चुकलो.

खरं म्हणजे सुधाकरला या रस्त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती आणि मालिनीने सुधाकरला मार्ग दाखवण्यात मदत करायला पाहिजे होती, पण मालिनी आपल्या बडबडण्यात डांग झाली आणि ते दोघेही रास्ता चुकले. आता परत एवढ्या मागे जाऊन, पुलावरून वळसा घेऊन योग्य रस्त्याला लागायचं म्हणजे खूप वेळ जाणार म्हणून सुधाकरने डाव्या बाजूस असलेल्या एका फाट्यातून आपली गाडी वळवली. मालिनीने या आडमार्गावरून का जातोय याची विचारणा केली पण परत मागे जायचा कंटाळा आला म्हणून हा मार्ग बघू नेतोय का आपल्याला हवं तिथे असं सुधाकर म्हणाला.

आडमार्ग असला तरी महामार्गापेक्षा रमणीय होता. दोन्ही बाजूस शेती, उंच झाडे, नागमोडी वळणे होती. तेवढ्यात सुधाकरला एका शेतात पंधरा-वीस माणसांची गर्दी दिसली. शेतावर कामआपली गाडी करणारे मजूर एका ठिकाणी जमा झलेले होते. मालिनी आणि सुधाकर आपली गाडी थांबवून त्या घोळक्याकडे गेले आणि विचारलं की काय भानगड आहे. तितक्यात त्याला एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. सुधाकरने सर्वाना विचारले विचारले, “काय रे काय प्रकार आहे?”

त्यांच्यातल्या एकाने सांगितलं की म्हाद्याला एक पोर सापडलं आहे. म्हादू पुढं येऊन सर्व हकीकत सांगायला लागला. सकाळी शेतावर येत असताना इथे कुणी दिसलं नाही. आणि आता या वेळेस जेवायला जात असताना मला पोराच्या रडण्याचा आवाज आला तर बघतो तर एवढंसं छोटं बाळ. जे बाळ ज्या बाईच्या मांडीवर होतं ती बाई म्हणाली, “शहरातलं असलं पाहिजे, एवढे चांगले कपडे घातले आहेत अंगावर, आई-बापानं मजा मारायची आणि जड झालं की अशा आडवाटेला येऊन पोराला टाकून द्यायचं.”

मालिनीने त्या बाईकडून ते रडत असलेलं बाळ आपल्या मांडीवर ठेवलं… तितक्यात त्या बाळाने रडणं थांबवलं. सुधाकरला हे पाहून बरं वाटलं. आता जवळच असलेल्या सरकारी इस्पितळात या मुलाला न्यायला पाहिजे कारण याला नंतर भूक लागेल, त्याची सोया करायला पाहिजे. हे म्हणत, सुधाकर आणि मालिनी दोघेही त्या बाळाला घेऊन आपल्या गाडीत येऊन बसले आणि जवळ असलेल्या गावात जायला निघाले. मालिनी गाडीत नेहमीप्रमाणे खूप बोलत होती परंतु यावेळी तिला काळजी होती या बाळाची.. याचे आई-वडील नाही सापडले तर काय होणार? याचं संगोपन कोण करणार? अनाथाश्रम? सुधाकर सुद्धा आपल्या मनात काय विचार चालू आहेत हे बोलायला तयार होत नव्हता, तो फक्त मालिनीचं ऐकत होता.

मालिनी त्यानंतर खूप वेळ शांत होती, काही वेळानंतर तिने आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली, “मला वाटतं की या बाळाचे आईबाप सापडू नयेत, आपण या बाळाचा सांभाळ करु.” आपल्या मनातलं मालिनीने बोलून दाखवल्याने सुधाकरसुद्धा खुश झाला. आपल्याला नाहीतरी बाळ दत्तक घ्यायचं आहे असा विचार आपण करत आहोत आणि आपल्याला ही निसर्गानेच देणगी दिलेली आहे हे बोलत दोघांनी त्या बाळाचे नाव आलोक ठेवले ज्याने आपल्या संसारात नवीन प्रकाश येईल.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version