मन सांग पां रावण काय जालें ।
अकस्मात तें राज्य सर्वे बुडालें ।।
म्हणोनि कुडी वासना सांडि वेगीं ।
बळें लागला काळ हा पाठिलागीं ।।१३।।
रे मना, चक्रवर्ती रावणाचे काय झाले? एवढे मोठे साम्राज्य, त्याच्या ध्यानीमनी नसता पार धुळीला मिळाले. दुष्ट, पापी वासना असली कि त्याचे परिणाम भोगावे लागतात. काळ ही स्वतंत्र शक्ती आहे जी सर्वांचा पाठलाग करत असते.