सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी ।
दुःखाची स्वयें सांडि जीवीं करावी ।।
देहदुःख तें सूख मानीत जावें ।
विवेकें सदा स्वस्वरुपीं भरावें ।।१०।।
नेहमी रामावर प्रेम करावे. जीवाला दुःखाची सवय जडली आहे ती सोडून द्यावी. आपल्याला होणारे देहदुःख हे परमेश्वराची योजना आहे असा त्या दुःखाचा स्वीकार करावा. आपले मन नेहमी विकाराने आपल्या सत् चित्त आनंद अशा स्वरूपात भरुन ठेवावे.