– सविता टिळक / कविता /
येईल का बांधता मैत्रीला व्याख्येच्या मर्यादांत?
होते जी व्यक्त अनेकविध रंगांत।
मैत्री कधी पहाटेचा मंद शीतल वारा।
कधी अवखळ मुक्त नाचरा झरा।
होई आधार कधी एकल्या मनाचा।
असते कधी उतारा दु:खावरचा।
होते कधी शाल उबदार मायेची।
ग्रीष्माच्या रस्त्यावर सावली वृक्षाची।
मैत्री भागल्या जीवा हक्काचा विसावा।
मैत्री जगातला अमूल्य ठेवा।
Advertisement