नात्यांची घडी

0
491

– योगिनी वैद्य / कविता

काही निवडक लोकांच्या हव्यासापोटी
भरडली जाते सारी मानवजाती
कधी कळणार या हव्यासी लोकांना
की हा हव्यासच आहे जीवघेणा

वावरू लागले सारे जर लावून स्वार्थाचे झापड
तर प्रत्येकाचे जगणे होणार नाही का अवघड
पण ज्यांचे ठरलेच आहे ठाम जगायचे तर स्वार्थात
कोणी सांगावे त्यांना खरे सुख असते परमार्थात

कधी विसरणार लोकं परस्परांबद्दलचा द्वेष
आणि कधी झटकणार हा मत्सररुपी वेष
अळवावरच्या पाण्यासारखे असावे द्वेश व मत्सर
साठून राहता मनात पडे सगळ्याचा विसर

मानवी मनात सतत चाले सर्व भावनांचा संवाद
हव्यास, स्वार्थ, मत्सर कसे असतील त्यास अपवाद
करता यांचा साठा तयार होई मनात अढी
नकळत विस्कटत जाईल नात्यांची घडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here