अनादि निर्गुण प्रगटली भवानी

जोगवा : संत एकनाथ

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासुर मर्दनालागुनी ।
त्रिविधतापाची कराया झाडणी । भक्तालागोनी पावसी निर्वाणी ।।१।।

आईचा जोगवा जोगवा मागेन । व्दैत सारुनी माळ मी घालीन ।
हातीं बोधाचा झेंडा मी घईंन । भेदरहित वारीसी जेईन ।।२।।

नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा । करुनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा ।
धरीन सभ्दाव अंतरीच्या मित्रा । दंभ सासरा सांडीन कुपात्रा ।।३।।

पूर्ण बोधाची घेईन परडी । आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वंडी । अभ्दुत रसाची भरीन दुरडी ।।४।।

आतां साजणी जालें मी निःसंग । विकल्प नवऱ्याचा सोडीला संग ।
कामक्रोध हे झोडीयले मांग । केला मोकळा मारग सुरंग ।।५।।

ऐसा जोगवा मुगुनी ठेविला । जाऊनी नवल महाव्दारी फेडिला ।
एकपणें जनार्दन देखिला । जन्ममारणाचा फेरा चुकविला ।।६।।

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!