जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

0
38
hari vitthal mauli

गीत : संत तुकाराम
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : लता मंगेशकर

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी हाती धरुनिया ।।१।।

चालो वाटे आम्ही तुझाची आधार
चालविसी भार सवे माझा ।।२।।

बोलो जाता बरळ करीसी ते नीट
नेली लाज धीट केलों देवा ।।३।।

तुका म्हणे आता खेळतो कौतूके
जालें तुझे सुख अंतर्बाही ।।४।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here