गंध

Honeybee and flower
  • – सौ. स्नेहा मनिष रानडे / कविता

गंध पंकजाचा भ्रमरासी भुलवतो,
गंध ओल्या मातीचा आसमंती दरवळतो

गंध मेहंदीचा
नववधूला सजवितो
गंध रातराणीचा
प्रियकराच्या मिठीत विसावतो

गंध पारंपारिक पैठणीचा
आईच्या संस्कारांची जाण ठेवितो
गंध आजीच्या गोधडीचा
अलवार मायेचे पांघरूण घालतो

गंध बाळाच्या शी-शू चा
घराचे गोकुळ बनवितो
गंध अन्नपूर्णेच्या हाताचा
सुग्रास भोजनाची मेजवानी देतो

गंध नव्या कोऱ्या वहीचा
उत्साह वाढवितो
गंध जुन्या ग्रंथांचा
ज्ञानाची साद घालतो

गंध शेतकऱ्यांच्या श्रमाचा
भरघोस पिकात उगवतो
गंध नवीन पाऊलवाटेचा
आव्हान स्वीकारतो

गंध चंदनाच्या लेपाचा
भगवंताच्या भाळी शोभतो
गंध कस्तुरी मृगाचा
तुज आहे तुजपाशीचे रहस्य समजावतो

गंध ज्ञान,कर्म भक्तीचा
जीवन फुलवितो
गंध ज्ञान, कर्म,भक्तीचा
जीवन फुलवितो

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here