लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
डॉ. साळुंख्यांशी चर्चा करुन आल्यावर चेंगने आलोकवर प्रयोग करायचे ठरवले. परंतु आलोकला त्यानंतर कधीच वेड्याचा झटका आला नाही. त्यादरम्यान स्पेस अकॅडेमीमधली शिक्षणाची वर्षे पुढे पुढे जात होती. ज्या विद्यार्थ्यांची तीन वर्षे पूर्ण झाली त्यांनी त्यांच्या पसंतीचा विषय निवडून पुढली तीन वर्षे त्या विषयाचा अभ्यास करायचा. चेंगने अंतराळप्रवासासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करायचे ठरवले होते. वेगवेगळ्या प्रकल्पांना सॅन्ड्रा आणि आलोक भेट देत होते. केवळ एका शेवटच्या प्रकल्पाला भेट द्यायची राहून गेली होती. पुढच्या वर्षीच्या अभ्यासाकडे लक्ष असल्याने बहुतेक जणांनी शेवटच्या प्रकल्पाकडे न जाण्याचा विचार केला होता.
सॅन्ड्राने आलोकला विचारले शेवटच्या प्रकल्पाला (सायक्लॉप्सला) भेट द्यायची का? त्यावर चेंग म्हणाला, तिथे जाऊन वेळ घालवण्यापेक्षा पुढच्या वर्षाची तयारी करा. पण आलोकला त्या सायक्लॉप्सला भेट द्यायची होती.
काही विद्यार्थ्यांना घेऊन एक एअरकार सायक्लॉप्सच्या टाऊन जवळ आली. तुटल्या मेजर साईक्स यांनी त्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. इतकं महत्त्वाचं उपकरण तुम्ही लोकांपासून गुप्त का ठेवतो असे आलोकने मेजर साईक्सने उत्तर दिले, इथे क्लासिफाईड कामं चालतात म्हणून त्यावर सुरक्षिततेचा पडदा आहे.
या सुंदर उपकरणाचा खगोलशास्त्रज्ञाना खूप उपयोग होऊ शकतो. असंख्य विशाल दुर्बिणीच्या साहाय्याने अंतराळातील हालचाली टिपून घेऊ शकतो. आलोक म्हणाला.
मेजर साईक्स म्हणाले, यापूर्वी इथे काही शास्त्रज्ञ होते त्यांच्या भरवशावर आम्ही हे उपकरण सोडलं होतं पण त्यांच्याकडून देशद्रोहाचं काम झालं.
आलोक : कोण होता तो शास्त्रज्ञ?
साईक्स : जॉन प्रिंगल