दुपल्ली : तालावर्तनांत एकच बोलसमूह दोन निरनिराळ्या लयकारीत वाजवून सम येते तेव्हा अशा गतीस ‘दुपल्ली’ गत म्हणतात. बोलसमूह जोडून वाजविताना मध्ये ‘धा’ घेऊनही वादन करतात.
उदा. तीनतालात दुपल्ली
ती ट क त । ग दिं ग न ।
धा धा धा तीट । कत गदिं गन धाधा ।। धा
तिपल्ली : तालावर्तनांत एकच बोलसमूह जोडून तीन निरनिराळ्या लयकारीत वाजवून सम येते तेव्हा अशा गतीस ‘तिपल्ली’ गत म्हणतात. तिपल्ली गतीचा शेवट कधीकधी तशाच प्रकारच्या बोलसमूहाच्या तिहाईने केला जातो.
उदा. तीनतालात तिपल्ली
दिं s ग दिं s ग तकीट तकीट । धात्रक धिकीट कतग दिंगन ।
धा दिंsग दिंsग तकीट तकीट । कतग दिंगन धा दिंsगदिंsग तकीट तकीट धात्रक धिकीट कतग दिंगन ।। धा
चौपल्ली : तालावर्तनांत एकच बोलसमूह जोडून चार निरनिराळ्या लयकारीत वाजवून सम येते तेव्हा अशा गतीस ‘चौपल्ली’ गत म्हणतात. बोलसमूहाची निरनिराळी लयकारी करतांना अक्षरांमध्ये थोडा बदल होऊ शकतो.
उदा. तीनतालात चौपल्ली
ती ट क त । ग दिं ग न ।
धा तीट कत गदिं । गन तीटकत गदिंगन तीटकतगदिंगन ।। धा