डॉ. साळुंख्यांचे निदान

0
31
Preshit

लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प

दिलेल्या अहवालाबद्दल चेंगने डॉ. साळुंख्यांना विचारले. आलोकच्या स्वप्नाचा निष्कर्ष काय आहे?

डॉ. साळुंखे बोलताना मुद्दा बाजूला ठेऊन भरकटत दुसऱ्याच विषयात हात घालतात याची चेंगला कल्पना होती म्हणून डॉ. साळुंखे जेव्हा त्यांच्या निष्कर्षांबद्दल सांगू लागले तेव्हा त्यांनी इतिहासातील नाना फडणीसाची गोष्ट सांगितली. चेंग त्यांना मध्येच थांबवत म्हणाला, इथे त्या नाना फडणीसाचा काय संबंध आहे. तर साळुंख्यांनी त्याला उदाहरण म्हणून ती गोष्ट पूर्ण केली.

नाना फडणीस कसे पुण्याच्या दरबारात असताना तिथे आलेल्या एका ब्राम्हणाची मातृभाषा ओळखतात. झोपेत असताना, मनातल्या मनात विचार करत असताना माणूस आपल्या जवळची बहुतकरून वापरतो त्यावरून आपण त्या माणसाची मातृभाषा कोणती हे ठरवू शकतो.

आलोक जेव्हा त्याच्या आई-वडिलांचा खरा मुलगा नसून दत्तक पुत्र आहे. त्यांना तो एका शेतात सापडला तेव्हा त्याचे वय ३ महिने असावे असा मी त्यावेळी निष्कर्ष काढला होता आणि मी त्याला त्यादिवसापासून ओळखतो. त्यावर सॅन्ड्रा म्हणाली, की आलोक जी भाषा स्वप्नात असताना बोलतो ती भारतीय काय या जगातली कुठलीही भाषा नाही.

डॉ. साळुंखे म्हणाले, आलोकला इतक्या वर्षांनी हे नक्कीच उमजलं असणार की आपण पृथ्वीवरचे नसून परग्रहावरचे आहोत आणि तो आपल्याला या गोष्टीबद्दल सांगण्याची धडपडदेखील करत असेल परंतु त्याला सांगता येत नसेल. कदाचित आपल्याला विचित्र वाटून त्याच्या भावना दुखावल्या जातील. आलोकला चंद्राचा प्रवास काही वेगळा वाटलं नाही त्यामागचं हेच कारण असू शकतं. तारू मारू हे त्याचे आईवडील असावेत. त्या लोकांनी आलोकला इथे काहीतरी संदेश देऊन पाठवलं असेल. त्याला त्या संदेशाबद्दल अजून माहित नाही पण माहित झालं तर कसा वागेल तो? आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असेल त्याचा?

चेंग म्हणाला, थोडक्यात म्हणजे आलोक पृथ्वीबाहेरचा आहे हे आपल्याला माहित आहे हे त्याला कळून उपयोग नाही. डॉ. साळुंखे आम्ही आलोकवर यापुढे विशेष नजर ठेऊ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here