दिंडी चालली चालली

Pandharpur Wari

गीत : मधुकर आरकडे
संगीत : देवदत्त साबळे
स्वर : शरदकुमार

दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला ।।धृ।।

टिळा वैष्णव हे ल्याले गळा हार तुळशीमाळा
एकतारी देते साथ टाळ-मृदुंगाच्या ताला
भागवताची पताका आलिंगीते गगनाला ।।१।।

गळा दाटला अभंग घोष विठु रखुमाई
अनवाणी पाउलांना कष्ट जाणवे न काही
चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला ।।२।।

आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीळचा
दुजी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा
भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला ।।३।।

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here