लेखक – जयंत नारळीकर
पुस्तकाचे नाव – यक्षांची देणगी
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
महाराष्ट्रातील विसापूर गावात आकाशातून एक तारा पडून खाली पडला. काही गावकऱ्यांनी त्या ताऱ्याला खाली कोसळताना पाहिला. पडताना तो खूप चकाकत होता पण त्यानंतर तो अगदी काळाकुट्ट झाला होता. गावकरी त्या ताऱ्याला घेऊन गावातील एका शिक्षकाकडे घेऊन गेले, शिक्षकाने खुलासा केला की, हा काही तारा नाही, असे हे बारीक दगड अवकाशात ग्रहांप्रमाणेच फिरत असतात आणि कधीकधी पृथ्वीवर आदळतात. त्यांना मिटिओराइट म्हणतात. गावकऱ्यांना याबद्दल आधी काही कळेना. की हा धोंडू कसलातरी जादूचा प्रकार असावा असा त्यांना संशय आला. त्यामुळे मास्तरांनी त्यांना सांगितले की, आकाशातून खाली पडताना वाऱ्याच्या घर्षणाने त्याला चकाकी येते. तालुक्याच्या गावी पाठवून तंत्रज्ञ बघतील काय करायचे ते.
या दगडाबद्दल भारतातील काही शास्त्रज्ञांनी खूप विचार केला आणि त्यातील डॉ. पी. ए. टी. राव यांनी न्यू यॉर्कच्या डॉ. डेव्हिड रॅटक्लिफ यांना फोन करून सर्व माहिती कळवली आणि त्वरित भारतात या दगडावर चर्चा आणि संशोधन करण्यासाठी बोलावले. त्याचबरोबर राव यांनी कॉर्नेलचे क्लॉड पेकेअर आणि लंडनमधील जॉन फ्लेमिंग यांनासुद्धा बोलावले. क्लॉड पेकेअर हे प्रीबायॉटिक केमिस्ट होते म्हणजे अंतराळातल्या जीवसृष्टीच्या शक्यतेचा अभ्यास करत होते आणि जॉन फ्लेमिंग मॅक्रोबायॉलॉजिस्ट आणि डॉ. राव आणि डॉ. डेव्हिड मिटिओराईट तज्ञ होते.
डॉ. राव यांच्या ऑफिसमध्ये जगातील प्रसिद्ध दहा शास्त्रज्ञांची सभा भरली होती. राव यांनीच सर्वाना तातडीने बोलावून घेतले होते. सभेला सुरुवात झाल्यावर तिथे उपस्थित मेंदूचे प्रख्यात तज्ञ डॉ. मथरानी यांनी सर्वांसमोर विसापूर येथे सापडलेला तो मिटिओराइट ठेवून दिला. डॉ. राव यांनी सर्वाना त्या दगडाबद्दल सर्व माहिती सांगितली. त्या गावात जेव्हा तो सापडला तेव्हा त्याचा रंग गडद होता अगदी काळाकुट्ट पण इथे इतक्या दिवसांनी आल्यावर तो पांढराशुभ्र झालेला आहे. तुम्ही सर्व इथे येण्याआधी आम्ही इथे काही प्रयोग करून पाहिले. त्या दगडाचा काही तुकडे घेतले त्यावर निरीक्षण केल्यावर असं आढळून आलं की त्यात जीवनाचे मूलघटक आहेत. मानवी मेंदूतून ज्या प्रकारच्या लहरी निघतात त्यासारख्या लहरी आम्हास दिसल्या. त्यामुळे माझा असा समाज आहे की या मिटिओराइटचा म्हणजे धोंडूचा कुठल्यातरी जीवसृष्टीशी संबंध आहे.
त्यानंतर त्या धोंडूवर अजून प्रयोग करण्यात आले. इलेक्ट्रोडचे काही बार धोंडूच्या पृष्ठभागावर लावले. धोंडूच्या मेंदूतून निघणाऱ्या लहरी कमीजास्त होताना आढळून आल्या. म्हणजे धोंडूचा मेंदू जागृत होता. त्यामुळे धोंडूवर अजून काही प्रयोग करायचे असे ठरले गेले. त्याला बायनरी अरिथमेटिक, बेरीज-वजाबाकी, अंकगणित, गुणाकार, भागाकार, भूमिती, पायथागोरसचे प्रमेय, युक्लिडचा सिद्धांत सर्व शिकविले गेले. आणि त्याचा बुध्यांक आईन्स्टाईनपेक्षा जास्त निघाला.
हे सर्व प्रयोग करत असताना डॉ. डेव्हिड यांना कसलीतरी अनपेक्षित धोक्याची चाहूल लागली. कारण धोंडूची प्रगती ही मानवी मेंदूच्या आवाक्याबाहेरची होती. त्यामुळे डेव्हिडला या अमानवी मेंदूची शक्ती मर्यादित ठेवायची होती. जेव्हा बाकीच्यांनी ठरविले की धोंडूला गणितीज्ञान अवगत झाले आता विज्ञान शिकवायला सुरुवात करु तेव्हा डॉ. डेव्हिड यांनी त्यास साफ नकार दिला. कारण मानवी संस्कृतीची गुरुकिल्ली ज्या सर्व शक्तीत साठली आहे ती गुरुकिल्ली आपणहून परक्याला द्यायची? त्यामुळे विज्ञान शिकविण्याआधी डेव्हिड यांनी अजून एक प्रयोग करून पाहिला.
त्याच सुमारास भारतदौऱ्यावर जगप्रसिद्ध बुद्धिबळपटू श्री. नोव्हिकॉव्ह आला होता. त्याच्यात आणि धोंडूमध्ये स्पर्धा ठेवण्यात आली. डॉ. डेव्हिड यांनी धोंडूला बुद्धिबळातील सर्व नियम आणि डावपेच शिकविले. बुद्धिबळपटू नोव्हिकॉव्ह सुरुवातीस एका दगडाबरोबर बुद्धिबळ खेळण्यास नकार दिला पण हा एक विज्ञानातील प्रयोगाचा भाग आहे असे सांगितल्याने आणि वेळेची मर्यादा ठेवावी या अटीने तो तयार झाला. काही वेळानंतर धोंडूने नोव्हिकॉव्हलासुद्धा बुद्धिबळात पराजित केले. धोंडूने नोव्हिकॉव्हला अतिआक्रमक पद्धतीने पराजित केले होते.
अशी विलक्षण खेळी आजपर्यंत कोणत्याच खेळाडूने केली नव्हती आणि त्यामुळे डॉ. डेव्हिड यांना संशय आला. त्यामुळे मला असे वाटते की या दगडात असलेल्या मेंदूचा आपण नाश करायला हवा. पण पेकेअर यांनी अजून प्रयोग करायला हवेत याची सूचना दिली. त्यावर लक्ष व्होल्टचा विदुतप्रवाह सोडण्यात आला, त्याला पुष्कळ किलोग्रॅम दाबाखाली ठेवण्यात आलं, परंतु तो प्रथम नष्ट झाल्यासारखा वाटू लागला पण लवकरच त्याचं पुनरुज्जीवन व्हायचं. तुकडे केले तरी प्रत्येक भागात जीवशक्ती आढळते. त्यामुळे आपण याचा नाश करू शकलो नसलो तरी आपण परत याला अवकाशात सोडू.
सर्व शास्त्रज्ञ आपापल्या देशी परतले. डॉ. राव यांनी इसरो तर्फे धोंडूला पृथ्वीबाहेर पाठवण्याची सोया केली. तोपर्यंत त्याला त्यांच्याबरोबर एका बंद काचेच्या पेटीत ठेवला होता. धोंडूच्या पृष्ठभागावर सूर्यकिरणे पडल्यामुळे धोंडूची कार्यक्षमता वाढते. डॉ. राव, धोंडूबाद्द्ल काही जास्तच विचार करत बसले आणि त्यांना चक्कर आली. दोन आठवडे बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांना काहीच आठवत नव्हते. पण धोंडूला अवकाशात पाठवण्याची तयारी जवळजवळ झाली होती.
एका लेक्चरमध्ये बसले असताना डॉ. राव यांना धोंडूच्या कार्यक्षमतेवर एक बाब लक्षात आली आणि त्वरित ते इसरो येथील अधिकाऱ्यांना सांगू लागले की धोंडूला अवकाशात पाठवू नका. धोंडूला सूर्यप्रकाशापासून ऊर्जा मिळते आणि जर तो पृथ्वीबाहेर निर्मल सूर्यप्रकाशात सोडला तर तो फार शक्तिवान होईल. बेशुद्ध होण्यापूर्वी मी विचार करत होतो की हा धोंडू कुणी गुप्तहेर तर नसेल दुरून कुठूनतरी आपल्या पृथ्वीवर आलेला. आपली कुवत हेरली आणि आता आला तिथे परत जातोय. पृथ्वीवरील वातावरणातून तो त्या लहरी पाठवू शकला नसता, आपण त्याला जमिनीत पुरून ठेवला असता. हे सर्व ऐकून झाल्यावर इसरोमधील अधिकारी म्हणाले, धोंडूला अवकाशात स्पेसलॅब ७ ने कधीच पाठवण्यात आलं.
स्पेसलॅब ७ मधून संदेश पाठविण्यात आला : मी ऍस्ट्रोनॉट १ बोलतोय. ऍस्ट्रोनॉट २ ने नुकताच धोंडुला बाहेर सोडलं आहे आणि धोंडूमध्ये विलक्षण बदल झाला आहे. त्याच्यावर सूर्यकिरणं पडल्यामुळे तो इतका चकाकत आहे की आम्ही त्याच्याकडे बघण्याचं टाळत आहोत. त्या धोंड्यातून निघालेल्या किरणांमुळे आमची अनेक मायक्रोवेव्ह डिटेक्शनची यंत्र फार सक्रिय झाली. त्याने Ursa Major Rays नक्षत्राच्या दिशेने सोडली आणि आम्ही त्या दिशेने गेलो तर आमची यंत्रं बंद पडतील त्यामुळे आम्ही तो मार्ग टाळत आहोत…