दत्त दिगंबर दैवत माझे

0
54
Shri_Guru_Dattatreya

गीत : कवी सुधांशु
संगीत : आर. एन. पराडकर
स्वर : आर. एन. पराडकर

दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे ।।धृ।।

अनुसूयेचे सत्त्व आगळे,
तिन्ही देवही झाली बाळे
त्रयीमूर्ती अवतार मनोहर,
दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे ।।१।।

तीन शिरे कर सहा शोभती,
हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरी पायी खडावा
भस्म विलेपित कांती साजे ।।२।।

पाहुनी पेमळ सुंदर मूर्ती,
आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती,
हळूहळू सरते मीपण माझे ।।३।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here