चेंगचा प्रयोग

0
28
Preshit

लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प

सायक्लॉप्स पाहून आल्यानंतर आलोक आपल्याच विचारात गुंग होता. चेंगने सॅन्ड्रा आणि आलोकला सायक्लॉप्सबद्दल विचारले असता सॅन्ड्रा आणि चेंग दोघेही त्याबद्दल बोलत होते परंतु आलोक शांत पण दोघांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन होता. मध्येच त्यांना अडवत ते दोघे सायक्लॉप्सबद्दल कशी चुकीची समजूत करून घेत आहेत हे सांगत होता.

जेव्हा आलोकने आपली विधाने बोलण्यास सुरुवात केली तेव्हा चेंगने आलोकमधील विशिष्ट हालचाल ओळखली आणि ते दोघे गेल्यानंतर डॉ. साळुंखे यांना फोन करून आलोकवर करण्यात येणाऱ्या प्रयोगाबद्दल कळविले.

दुसऱ्यादिवशी जेव्हा सॅन्ड्रा नाश्त्यासाठी कॅंटीनमध्ये आलोकची वाट बघत बसली असताना फार वेळ झाला तरी आलोक आला नाही म्हणून आलोकच्या रुमजवळ गेली तेव्हा तिला शंका आली की आलोक रूमचा दरवाजा उघडत नाहीये म्हणून ती तिथल्या वैद्यकीय मदतीसाठी विचारणा करणार तितक्यात तिथे चेंग आला आणि काल रात्री आलोकवर
आपण डॉ. साळुंख्यांच्या मदतीने प्रयोग केला हे विस्ताराने समजावले.

रात्रभर झोपला असताना एका रेकॉर्डवर त्याच्या मेंदूतील लहरी विशिष्ट काळासाठी वेगाने बदलत होत्या. त्याच्या बाह्यमनातील विचारांना बाजूला सारून अंतर्मनातले अनुभव समजून घेण्याचा हा प्रयोग होता. त्यादिवशी बागेमध्ये असताना जसा त्याला वेड्याचा झटका आला होता त्याच पद्धतीच्या हालचाली आपण काल सायक्लॉप्सबद्दल चर्चा करत असताना आलोकच्या शरीरात दिसत होत्या म्हणून हा प्रयोग मी आणि साळुंखे यांनी केला.

परंतु या प्रयोगावरून आपण निष्कर्ष काढू नाही शकत. त्याकरिता आपल्याला डॉ. साळुंखे यांची मदत घ्यायला हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here