चंद्राची सफर

0
17
Preshit

लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प

श्री. मिश्रा, आलोकच्या शाळेतले शिक्षक, आलोकच्या बुद्धिमत्तेवर खूपच प्रभावित झाले होते. इतक्या कमी वयात अशक्य अशी गणिते कमी वेळेत सोडवून आलोकने मिश्राजींना आश्चर्यचकित करून टाकले होते. एकदा मिश्राजी आलोकला एक कोडं घातलं, जे तीन वर्षांपूर्वी एका विख्यात गणितीतज्ञाने सोडवून दाखविले होते. त्याच्या या कामगिरीमुळे त्यांनी एकदा त्याच्या घरी भेट दिली आणि सुधाकरशी त्याच्याबद्दल माहिती दिली.

मिश्राजी एवढ्या वर्षांनी आपल्या घरी आले म्हणजे नक्कीच काहीतरी अतिमहत्त्वाचे काम असणार म्हणून सुधाकरसुद्धा आधीपासूनच तयारीत होता. मिश्राजींनी सुधाकरला सांगितले की इतक्या लहान वयात इतकी विलक्षण प्रतिभा असणे साधी गोष्ट नव्हे आणि म्हणून मी एक निर्णय घेतला आहे की आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यास मी आलोकचे नाव देत आहे. वर्ल्ड टॅलेंट स्कीम या नावाच्या स्पर्धेत जगातील प्रतिभावान विद्यार्थी भाग घेतात आणि त्यातून १० जणांची निवड चंद्रावर सफर करण्यासाठी केली जाते.

मिश्राजी आलोककडून W T S परीक्षेची तयारी करून घेतात. या परीक्षेत घोकंपट्टीला वाव नसतो. उत्तर कसे लिहावे यापेक्षा विषय किती कळला आहे याला महत्त्व असते. अथक परिश्रमानंतर आणि आलोकच्या विलक्षण बुद्धीमुळे आलोक या परीक्षेत सर्वप्रथम निवडून येतो.

इंटरनेशनल शटलव्हेजतर्फे त्या दहा प्रतिभावान मुलांना चंद्राच्या सफरीसाठी नेण्यात येते. शटलमध्ये दहा विद्यार्थी आणि पाच शिक्षक व निरीक्षक एवढेच प्रवासी असतात. स्पेस स्टेशन १ वरून चंद्राकडे याने जातात तिथून त्यांचे शटल सुरु होते. या सफरीमध्ये आलोकची सॅन्ड्राशी ओळख होते. स्पेस स्टेशन १ वर आल्यावर निरनिराळ्या गमतीजमती पाहण्यात इतर मुले दंग होती, खेळात होती, परंतु आलोक अगदीच शांत होता, पहिल्यांदाच अशा सफारीचा आनंद लुटताना त्याला त्याचे काही अप्रूप वाटत नव्हते. फारच विचारमग्न होऊन तिथल्या वातावरणाचे निरीक्षण करत होता. त्यानंतर तिथून शशांक नावाच्या अंतराळ यानातून त्यांना चंद्रावर घेऊन जाण्यात आले. त्यास त्यांना २८ तास लागले. ही सफर आलोकसाठी फारच अविस्मरणीय होती.

घरी परतल्यावर मालिनीने आलोकला तिच्यासाठी काय आणलं म्हणून विचारले असताना आलोक म्हणाला, “चंद्रावर दगड आणि धोंडे जास्त मिळतात. तुला आवडणारे हिरे मोती तिथे नाही मिळत. एक ताईत आणि अंगठी हे दोन अलंकार अलोकने मालिनीला दिले. आलोकने सुधाकरसाठी एक t -shirt आणला होता त्यावर चंद्राची महती सांगणारे सुभाषित लिहिले होते.

वरमेको गुणी पुत्रो न च मूर्खशतान्यपि ।
एकश्चन्द्रस्तमो हन्ति न च तारागणोऽपि च ॥

अर्थ : शंभर मूर्ख पुत्रांपेक्षा एक गुणवान पुत्र चांगला ।
एकटा चंद्र आधाराचा नाश करतो पण ताऱ्यांच्या समूहाने अंधारही नाश नाही होत

सुधाकरला आलोकने लहान वयात केलेल्या या सफरीबद्दल फार अभिमान वाटत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here