लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
सर पीटर यांच्या अभ्यासिकेत सर पीटर आणि आलोक बराच वेळ गप्पा मारत बसले होते. आलोकने सर पीटर यांना आपले ओळखपत्र दाखवून खात्री करून दिली की तो कुणी गुप्तहेसर नसून सायक्लॉप्स येथील नवोदित शास्त्रज्ञ आहे आणि त्याला एका प्रकल्पावर काम करण्यासाठी मदत हवी आहे. या गोष्टीला बासष्ट वर्ष होत आली आणि हा या प्रकल्पावर काम करतोय हे पाहून सर पीटर यांना आनंद झाला.
आलोकने सर पीटर याना विचारले, “अपघातापूर्वी जॉन प्रिंगलने तुम्हाला फोन करून तुम्हाला भेटण्यासाठी बोलावले होते. ते तुम्हाला काहीतरी सांगणार होते. तुम्ही हायकिंगला जाणार होता. हायकिंगला जाण्यावर माझा काही विश्वास नाही परंतु प्रिंगल तुम्हाला काय सांगणार होते हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यांच्याबरोबर एक रेकॉर्ड टेप होती.” टेपचा विषय आल्यावर सर पीटर म्हणाले की, “कारचा स्फोट झाल्याने टेपचासुद्धा निकाल लागला असणार.”
आलोकला संशय आला की सर पीटर अजूनही खरं सांगत नाही, त्यांना बोलतं कसं करावं याकडे त्याचं लक्ष होतं. त्याने अजून संबंधित प्रश्न विचारायला सुरुवात करताच सर पीटर यांना आलोकच्या आशावादीपणाबद्दल आदर निर्माण झाला. त्यांनी सांगितले की, प्रिंगल अंतराळात राक्षसी ताऱ्यांचा शोध घेत होता आणि त्याने त्या ५० ताऱ्यांची नावे नोंदून ठेवली होती आणि त्यातील फक्त ३ तार्यांबद्दल शोध बाकी होता आणि त्याबद्दल सर पीटर यांना काहीच माहित नव्हते. आलोकने त्यानंतर प्रिंगलचा जेथे अपघात झाला त्या जागेविषयी विचारले. त्या जागी टेप अजूनही सापडू शकते अशी दाट आशा आलोकला होती.