गीत : सुधीर मोघे
संगीत : सुधीर फडके
स्वर : आशा भोसले
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई ॥धृ॥
साऱ्या चराचरी तीच जीवा संजीवनी देते
तीच संहार प्रहरी दैत्य दानव मारीते
उग्रचंडी रूपा आड झरा वात्सल्याचा गाई ॥१॥
क्षेत्र नामवंत एक नाव कोल्हापूर
अगणित खांबावरी राहिले मंदिर
नाना देवके भोवती देवी मधोमध राही ॥२॥
तुळजापूरीची भवानी जणू मूळ आदिशक्ती
घोर आघात प्रहार तीने पचविले पोटी
स्वत: तरली भक्तांना सई तारुनिया नेई ॥३॥
अमरावतीची देवता शाश्वत अमर
अंबेजोगाईत तिने मांडियेले घर
मुंबापुरीच्या गर्दीला दान चैतन्याचे देई ॥४॥
कुणी म्हणती चंडिका कुणी म्हणती भवानी
दुर्गा दूघट यमाई अंबा असुरमर्दिनी
किती रुपे किती नावे परि तेज एक वाही ॥५॥