लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
सर पीटर आणि सॅन्ड्रा कंट्रोलरूममध्ये जाऊन बघतात तर आलोक आपल्या कामात व्यस्त होता. त्याने बरीच टिपणं केली होती. त्याची भाषा काही अपरिचित होती. जेव्हा त्याने तिथल्या एका उपकरणावर डोकावून पाहिले तेव्हा त्यांना दिसले कि आलोक आरिस्टार्कस ताऱ्याबद्दल शोध घेत होता.
आपल्या व्यस्त कामातून जेव्हा त्याने सर पीटर आणि सॅन्ड्राकडे बघितले तेव्हा त्याने त्यांना ओळख दाखविली नाही. सॅन्ड्राने त्याला आपली आणि सर पीटरची ओळख करून दिली तेव्हा कुठे त्याला सर्व आठवत गेलं. आलोकने त्यांना विचारले की ते सायक्लॉप्सवर कधी आणि कसे आले? त्यावर सॅन्ड्रा म्हणाली, आम्ही तुला तुझ्या या प्रयोगापासून परावृत्त करायला आलो आहोत. सर पीटरनी रागाने विचारलं, “तुझ्याबद्दल तू मला खरं का नाही सांगितलं? मी तुला कुठलीही माहिती दिली नसती”
आलोकने नंतर स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. तो परग्रहावरचा माणूस आहे. आरिस्टार्कस, आम्ही त्याला तालमान म्हणतो. तो हळू हळू फुगत चालला आहे त्यामुळे आम्ही ज्या ग्रहावर राहिलो, वाढलो रानटीपणापासून सुसंस्कृत झालो त्यावर राहाणं आता आम्हाला अवघड झालं आहे. म्हणून आम्हाला तुमच्या ग्रहापासून एक संदेश आला आणि आम्ही त्याला उत्तर दिले. त्यामुळे आमच्या ग्रहावरील शास्त्रज्ञानी माझ्यासारख्या माणसांची एक तुकडी केली आणि आम्हाला पृथ्वीवर पाठवले. पण अंतराळातच आमच्या यानाचा स्फोट झाला परंतु त्यामध्ये मी सुखरूप पृथीवर आलो. प्रिंगलने पाठवलेल्या संदेशामुळे आम्हाला इथे येणं सोयीस्कर झालं. आमच्या ग्रहावरचे बांधव तुमच्या ग्रहावर येतील. आपण सर्व एकत्र राहू. आमच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे तुम्हालाही फायदा होईल. पृथ्वीतलावर जे काही छोटे छोटे कीटक आहेत ज्यांनी मानवाला त्रास होतो ते आम्ही समूळ नष्ट केले आहेत पर्यावरणाला कुठलाही धोका न देता. त्यामुळे आम्हाला तुमच्या ग्रहावर येऊ द्या.
सॅन्ड्राने आलोकला कुठल्याही मदतीची अपेक्षा ठेऊ नकोस असे सांगितले. सर पीटरना सांगताना ती म्हणाली, यांच्या ग्रहावर यांनी क्षुद्र कीटकांना मारून टाकले. पुढे हे आपल्यालासुद्धा मारून टाकतील कारण आपण यांच्यापेक्षा अप्रगत आहोत. सर पीटरने सर्व ऐकून त्यांच्या हातातलं आलोकचे टिपण आलोकल परत देत म्हणाले, “संबंध मानवजातीचे भवितव्य माझ्या एकट्यावर असेल असं मला कधी वाटलं नव्हतं.” आपल्या पृथ्वीतलावर राजकीय पक्षांनी कधीच विज्ञानाची, तंत्राची किंमत ओळखली नाही.
आलोकच्या ग्रहावरील शास्त्रज्ञाची मदत घेऊन आपण आपली जीवसृष्टी अजून बळकट करू.
आलोक सायक्लॉप्सवर भराभर संदेश पाठवत होता. आपल्या आयुष्यातली मुख्य जबाबदारी संपली असा भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटत होता. सायक्लॉप्सचा डोळा आरिस्टार्कसवर रोखला गेला होता.