लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
आलोकशी काहीच संपर्क साधू न शकल्यामुळे सॅन्ड्राने सर पीटरना भेटण्यासाठी विनंती केली. तुमच्यात आणि आलोकमध्ये असं काय बोलणं झालं ज्याने तो इतका भारावून गेला आणि मला काही न सांगता तिथे निघून गेला. सॅन्ड्राला शंका होती की आलोक काहीतरी तिच्यापासून लपवतोय.
सर पीटरने सॅन्ड्राला सर्व माहिती सांगितली. आपल्याला भेटून तो त्या घाटाच्या दिशेने गेला. कसल्यातरी उपकरणाच्या शोधात. एक हरवलेली टेप. जेव्हा सर पीटरने सॅन्ड्राला सर्व हकीगत सांगितली तेव्हा सॅन्ड्रा खूपच विचारात पडली. तिने सर पीटरना आलोकबद्दल गुप्त माहिती सांगितली. ती ऐकून सर पीटर अवाक झाले. जॉन प्रिंगलने सायक्लॉप्सद्वारे अंतराळात पाठवलेले संदेश स्वीकारकरून दुसऱ्या जीवसृष्टीवरच्या माणसांनी आलोकला प्रिंगलचे उत्तर म्हणून तर पाठवले नसेल? हा विचार सर पीटर यांनी केला आणि तात्काळ त्यांनी काही निर्णय घेऊन आपल्याला पूर्ण दिवसभरात बरीच कामं करायची आहेत असे सॅन्ड्राला सांगितले. सायक्लॉप्सवर जाऊन आपल्याला आलोकला भेटायला हवं.
आलोकने आपल्याला सांगितलेल्या काही गोष्टींचा उलगडा सॅन्ड्राला होत होता. सर पीटर यांनी सोकोरो येथे आधीच एक भक्कम अशी कार भाड्याने घेऊन ठेवली होती. ६० मैल प्रवास करून एका अरुंद खडबडीत मार्गावरून सायक्लॉप्सकडे जाण्याचा मार्ग होता. प्रिंगलने या मार्गाचा शोध लावला होता, सर पीटर सॅन्ड्राला सांगत होते. हा एकाच असा अनधिकृत मार्ग होता जो सायक्लॉप्सच्या इमारतीत जात होता.
त्या रस्त्याच्या अखेरीस एक मॅनहोल होते. इतकी वर्ष झाली तरी ते तसेच्या तसेच असल्याने सर पीटर यांना त्या मॅनहोलद्वारे आत प्रवेश करता येणे शक्य झाले. तिथले सर मार्ग त्यांना ठाऊक होते. सॅन्ड्रा आणि सर पीटर आता मॅनहोलमधल्या अरुंद वाटेतून सायक्लॉप्सच्या कंट्रोलरूमखाली आले. दोघेही त्या मॅनहोलच्या शिडीने जेव्हा वर चढले तेव्हा त्यांच्यासमोर कॉन्ट्रोलरूमची इमारत होती.