टेपच्या शोधात

लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प

सर पीटरचा निरोप घेऊन आलोक बाहेर पडला. त्याच्याजवळ प्रिंगलचा जेथे अपघात झालेला त्या ठिकाणाचा नकाशा आणि ताऱ्यांची यादी होती. त्याच्या पुढील शोधासाठी एक महत्त्वाचं उपकरण आवश्यक होतं परंतु खूप शोधल्यावर त्याला असं समजलं की ते उपकरण मिलिटरीकरिता बनवलं जातं आणि ते परवानाधारकांना दिलं जातं. आलोकने त्या उपकरण पुरवणाऱ्या मॅनेजरला सांगितले की मी परवाना आणू शकतो पण आता माझ्याकडे नाही आणि मला अत्यंत आवश्यकता आहे या उपकरणाची. आलोकने थाप मारली की, तुम्ही व्हाईस मार्शल गोम्सना फोन करून विचारू शकता. मॅनेजरने अलोकचा सायक्लॉप्स कार्ड तपासले आणि तिथल्या सहकाऱ्याला आलोकला हवं असलेल्या उपकरणासाठी मदत करा म्हणून सांगितले.

सायक्लॉप्स प्रकल्पासाठीची मुदत संपायला एकच दिवस बाकी होता त्यामुळे आलोकने परतीसाठी हेलिकॉप्टरने जाण्याचा निर्णय घेतला. फोर्ट अपाचे आणि घाटाचा प्रदेश दिसल्यावर त्याने दुर्बिणीने आसपासचा प्रदेश न्याहाळायला सुरुवात केली. तितक्यात त्याला त्या घाटाच्या एका झुडुपात एक सांगाडा दिसला. एका जळक्या मोडक्या कारचा तो सांगाडा होता. त्यानंतर आलोकने एका डबीतून एक यंत्र काढले तिथला आसपासचा सर्व प्रदेश त्याने त्या यंत्राने शोधला. तरी ते यंत्र त्याला जे पाहिजे होते त्यासाठी सिग्नल देत नव्हते. त्यानंतर अथक परिश्रमानंतर त्याने ते यंत्र फेकून दिले आणि तिथेच पडून राहिला. सूर्यास्त होत होता, आकाशात पक्ष्याचा कुजनाचा आवाज त्याला ऐकायला आला परंतु त्याला तो पक्षी दिसला नाही. त्याच्या बाजूला त्याने त्या पक्षाला शोधले पण तो पक्षी काही दिसला नाही. नंतर त्याला समजले की हा पक्ष्याचा आवाज नसून त्याच्या यंत्राचा आवाज आहे. ते यंत्र त्याला एका खड्ड्यात सापडले आणि त्याच्या शेजारी एक काळी टेप होती. प्रिंगलने अपघात व्हायच्या आधी कारमधील एक बटण दाबून चोरकप्पा आधीच बाहेर फेकला गेला.

आलोकला टेप मिळाल्यानंतर त्याने ती ऐकण्यासाठी रेकॉर्डर कुणाकडे मिळू शकते याचा तपस केला कारण इतके जुन्या बनावटीचे रेकॉर्डर सध्या बनत नव्हते. तिथल्या एका दुकानदाराची मदत घेऊन त्याने डॉ. क्लाईव्ह यांच्याशी संपर्क साधला ज्यांच्याकडे तो रेकॉर्डर होता. आलोकने त्यांच्याशी संपर्क साधून तो त्यांच्या घरी टेप रेकॉर्डरवर टेप ऐकण्यासाठी गेला. तिथे त्याला त्या टेपमधली माहिती मिळाली : तारीख ५ डिसेंबर १९८५, निरीक्षणाचा उद्देश : परकीय जीवसृष्टीचा शोध, पाहण्याचे ठिकाण…

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!