गीत : प्रवीण दवणे
संगीत : नंदू होनप
स्वर : सुरेश वाडकर
दत्त नामाचा लागो छंद
दत्त गोविंद दत्त मुकुंद
दत्त रुपाला आळविताना
मोहाचे तुटले बंध ।।१।।
नाम एक हे अखिल जगातून
ज्ञानरवीचे किरण तयातून
दत्तप्रकाशा झेलीत असता
जगणे परमानंद ।।२।।
दत्त बघावा दत्तच गावा
पदोपदी मज दत्त दिसावा
तेहतीस कोटि एकाठायी
वसले हो स्वच्छंद ।।३।।
समोर आता दत्तच तारा
दत्ताविण मज नाही किनारा
गुरुमायेच्या पवनामधुनी
दत्तकृपेचा गंध ।।४।।
Advertisement