- – कल्पेश वेदक / कविता
मर्म हेच सांगतं की
आईच्या कुशीत जन्म
पाप पुण्य सर्व तुझं
भोगलेस तू जे कर्म…
जन्म जन्म हा मिळतो
लक्ष योनींचा तो फेरा
बुध्दी भावनेच्या संगे
मांडे तिचा खेळ सारा…
जन्म यालाच म्हणावा
ज्याला अनेक प्रहार
सोशीत ही तूच आली
त्याचे करुन संहार…
तुझ्याविना कसा तारु
मोठी होईल आबाळ
साथ कुणाचीही नाही
जीवन हेचि कातळ…
लक्ष जन्म हाच मिळो
तुझी कूस हे आंगण
तसे कर्म मी करेन
जे मिळेल हे आंदण…
Advertisement