- – स्नेहा रानडे / कविता /
नाही रामनवमी, नाही जन्माष्टमी
नाही झाली पंढरीची वारी
आता तर निघालीय कैलासातून बाप्पांची स्वारी
होता आगमन बाप्पाचे
होईल निवारण दु:खांचे
मोजकेच पाहुणे, मोजकीच आरास
तरी होणार नाही आम्ही निराश
ठेऊन परिस्थितीचे भान
घरात राहून गाऊ बाप्पांचे गुणगान
मिळेल आठवणींना उजाळा
त्यातूनच लाभेल उत्साह निराळा
बसतील शांतपणे भक्त बाप्पाजवळ
देईल समाधान त्यांचच अंतर्मन
तूच चिंतामणी, तूच विघ्नहर्ता
तूच आहे आम्हां संगे सदा सर्वदा
हसून आशीर्वाद देत म्हणतील बाप्पा
कराल पालन नियमांचे
नक्कीच दूर होईल संकट कोरोनाचे
Advertisement