– सविता टिळक / कविता /
भयाने ग्रासलेल्या मानवाला, त्याच्या मर्यादांची पुरेशी जाणीव करून दिल्यानंतर जीवनाने आपला अंकुश दूर सारायला सुरूवात केली. श्रावणातल्या बहरातून जीवन पुन्हा एकदा मानवाला जणू सांगतंय… हे माझं खरं रूप आहे… मला असंच सांभाळलंस तर मी सदैव तुला बहरत ठेवेन…
रानी वनी श्रावण बहरला।
ऊन पावसाचा खेळ रंगला।
हिरव्या शालूत नटली वनराणी।
फूल, फूल उमलले पानोपानी।
ओसरली काजळी काळोखाची।
आकाशी झळाळी इंद्रधनू रंगांची।
रंग, गंधाने आसमंत खुलला।
जलबिंदूंचा हार वेलींवर सजला।
जागे मनी आस नवजीवनाची।
नयनी तरळती स्वप्ने उद्याची।
वेळूचा सूर हृदयी रुणझुणला।
आनंदगीतांत जीव सुखे रमला।
Advertisement