– योगिनी वैद्य / कविता /
एका नदीतीरी त्यांनी एकमेकांना पाहिले
न बोलताही दोघांना क्षणात काहीतरी उमगले
ती कोण कुठली कसलीच नाही माहिती
तो कोण कसा असेल तिच्या मनीची भिती
दोघांच्याही मनी विचार करावी का सुरूवात
भिडस्तपणा दोघांचा आला त्याच्या आड
नियतीनेच पुन्हा आणले त्यांना एकमेकांसमोर
उभे होते दोघे त्याच नदीच्या भिन्न किनाऱ्यांवर
दोघांच्या मनात होती भावनांची चढाओढ
ओळख नसतांनाही वाटणारी एक अनामिक ओढ
मौनातल्या त्या संवादाने दोन्ही मने सुखावली
कौल मिळता हृदयाचा नेत्रांनी दिली प्रेमाची कबुली