- स्नेहा रानडे / कविता /
३३ कोटी देवांची भरली आहे सभा
विष्णु आहे सभापती मधोमध उभा
विष्णु म्हणाला, विष्णु म्हणाला,
काय हालहवाल सर्वांची..
मारूतीराया म्हणाला,
पृथ्वीवरचे लोक हवालदिल झाले
कोरोनामुळे घरात बंद झाले
सरस्वती म्हणाली, सरस्वती म्हणाली,
आपली देवळेही बंद झाली
भितीने माणसे घाबरू लागली
इंद्र म्हणाला, इंद्र म्हणाला
या संकटावर उपाय काय
लक्ष्मी म्हणाली,
हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे
पवन देव म्हणाले
पण लोक ऐकतच नाहीत
Lockdown झाले तरी घरात बसतच नाही
दुर्गा म्हणाली दुर्गा म्हणाली
या राक्षसाला मीच नष्ट करते
सगळ्यांवरचे संकट दूर करते
ब्रम्हदेव म्हणाले, ब्रम्हदेव म्हणाले
पण एक फायदा
माणसातल्या देवाकडे लोक बघू लागले,
पोलीस डाँक्टर, नर्स, शेतकरी यांचे ऐकू लागले
विष्णु म्हणाला, विष्णु म्हणाला,
परिञाणाय साधुनाम्
सज्जनांच्या मदतीला मी नक्की जाईन
शास्ञज्ञांंच्या मार्फत औषध शोधीन..
जगातला हाहाकार थांबवीन..
३३ कोटी देवांची भरली आहे सभा
विष्णु आहे सभापती मधोमध उभा…