मनाचे श्लोक – समर्थ रामदास

नको रे मना क्रोध है खेदकारी ।
नको रे मना काम नानाविकारी ।।
नको रे मन लोभ हा अंगिकारुं ।
नको रे मना मत्सरु दंभ भारू ।।६।।

रे मना, परिणामी दुःख देणारा क्रोध करू नये. तसेच नाना विकार उत्पन्न करणारा काम मनात बाळगू नये. लोभाने देह भरून ठेवू नये व मत्सर आणि दंभ याने मन भरून ठेवू नये.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here