मराठी दलित साहित्यातील प्रसिद्ध लेखक कै. दगडू मारुती पवार. विद्रोही व दलित साहित्य चळवळीतले एक महत्वपूर्ण लेखक म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. जागल्या या टोपणनावानेही त्यांनी लेखन केलेले आहे. भारतीय समाजाच्या भीषण, भेदक वास्तवाचं प्रखर दर्शन पवारांनी कथेच्या माध्यमातून घडविलं. त्यांचे लेखन प्रामुख्याने समाजजीवनातील असमानता, जातीय विभाजन यासारख्या विषयांवर केले आहे. पवारांचा परभाषिक साहित्याचा व्यासंग दांडगा होता, तसेच त्यांच्याकडे समीक्षकाची विजीगिषु, विश्र्लेषक वृत्ती होती त्यांच्या अंगी होती.
पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. दया पवारांची खरी ओळख मराठी साहित्याला आणि पर्यायाने महाराष्ट्राला झाली ती ‘बलुतं’मुळे! त्यांचं हे आत्मकथन अफाट गाजलं. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने लिहिलेले पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली. त्यांच्या लेखनातून राष्ट्रीय पातळीवरचा सामाजिक, सांस्कृतिक तसेच साहित्यिक क्षेत्रातले सक्रीय सहभाग दिसून येतो. दलित साहित्यातील ते अग्रणी लेखक म्हणून नावाजलेले साहित्यिक आहेत.