मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ।।
मना कल्पना ते नको विषयांची।
विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ।।५।।
मना कधीही पापसंकल्प मनात येऊ देऊ नयेत. नेहमी मनात सत्यसंकल्प जागवावेत. मोह पाडणाऱ्या वस्तू व विचार यांची कल्पनाही करू नये. पापसंकल्प, पापबुद्धी व विषय विकार यामुळे लोकांत आपली छी थू होते, उपहास होतो. म्हणून नेहमी सत्यसंकल्प करावेत.
Advertisement