प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ।
पुढें वैखरी राम आधीं वदावा ।।
सदाचार हा थोर सोडूं नये तो ।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ।।३।।
प्रातःकाळी उठल्यावर प्रथमतः मनामध्ये श्रीरामाचे, देवाचे स्मरण करावे. नंतर वैखरीने म्हणजे तोंडाने मोठ्याने ‘राम’ नाम घ्यावे. हा सदाचार नेहमी पाळावा. सोडू नये. या सदाचाराने राहणारा मनुष्य गौरवास पात्र होतो. धान्य होतो.
Advertisement