- – योगिनी वैद्य / कविता /
जीवनप्रवाहात अनेक माणसांशी येतो संबंध
पण मोजक्याच लोकांशी जुळती खरे ऋणानुबंध
कालांतराने या ऋणानुबंधांचा पडे विसर
पण आठवणी मात्र राहती मनात करुन घर
जसे ठरवून कुणाशी नाते जोडता येत नाही
तसे काहीही केले तरी आठवणी विसरता येत नाही
रोजच्या रोज पडत असते या आठवणींमध्ये भर
मनाचा एक छोटासा कप्पा होतो त्यांचे घर
चांगल्या-वाईट, आनंदी-दु:खदायी आठवणींचे अनेक प्रकार
आठवणीच नसतील आयुष्यात तर जगण्याला कसला आधार?
Advertisement