गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : सुधीर फडके
स्वर : आशा भोसले
ओठांत हाक येते, सानंद गीत गाता
येणार नाथ आता, येणार नाथ आता ॥धृ.॥
मी पाऊले पहाते दारात थांबलेली
ये अंगणात छाया आधीच लांबलेली
लग्नात लाभलेला, हो स्पर्श भास हाता ॥१॥
आली फुलून गात्रे, ये प्राण लोचनांत
सारे मुहूर्त आले, एका खुळया मनात
धारेत अमृताच्या गेला भिजून माथा ॥२॥
आता नका क्षणांनो, दोघांत भिंत घालू
स्वर्गासवे मला द्या भूमीवरुन चालू
ते प्राणनाथ माझे, मी दैवदत्त कांता ॥३॥