गीत : शांताराम नांदगावकर
संगीत : अनिल – अरुण
स्वर : अनुराधा पौडवाल, पं. वसंतराव देशपांडे
चित्रपट : अष्टविनायक
प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया ।।धृ।।
विघ्नविनाशक, गुणिजन पालक, दुरित तिमिर हारका
सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्यासारखा
वक्रतुंड ब्रम्हांडनायका, विनायका प्रभुराया ।।१।।
सिद्धिविनायक तूच अनंता, शिवात्मजा मंगला
सिंदूरवदना, विद्याधिशा, गणाधिपा वत्सला
तुच ईश्वरा साह्य करावे, हा भवसिंधु तराया ।।२।।
गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसुता
चिन्तामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता
रिद्धि सिद्धीच्या वरा, दयाळा देई कृपेची छाया ।।३।।