– मानसी उपेंद्र वैद्य / कविता /
रिमझिम पाऊस, झिमझिम पाऊस,
गर्द निळ्या रात्री चंदेरी, चंदेरी पाऊस.
कधी राखाडी रात्री आकाशी सारवा,
पांघरे हिरवाई, गंध-सुगंधी मारवा.
श्रावणाचा गंध भरे रानावनात,
बेधुंद भावना भरती तन, मनात.
गुलाबी, पिवळा, लाल, निळा रंग
खुलले निसर्गाचे अंग, प्रत्यांग
जाई, जुई, चाफा, संमिश्र सुगंध,
वाटे मिसळून जावे त्यात तोडून सारे बंध, तोडून सारे बंध.