गीत : प्रवीण दवणे
संगीत : नंदू होनप
स्वर : अनुराधा पौडवाल
एकतारी गाते गुरुनाम समर्था
नादावली गुरुपायी
आसावली भेटीसाठी ।।धृ।।
चित्त ओढ घेई स्वामीसमर्थाने
दर्शन के धावा स्वामी देणार मला रे
वेड लागे सूर जागे माझ्या गुरुसाठी ।।१।।
मठातूनी गुरुवारी नित्यजपध्यान
पदर पसरुनी मी धरिते चरण
नाम घेते, आळविते जप तुझा ओठी ।।२।।
अक्कलकोटी हो तुमचा निवास
दाहिदिशातुनी वाहे कृपेचा सुवास
प्रगटावे योगिराज आज भक्तासाठी ।।३।।