– मानसी बोडस / कविता /
इतकं नाही सोपं, कविता वाचणं ।
नुसतंच वाचण्यापेक्षा, ती समजणं ।।
इतकं नाही सोपं, कविता लिहिणं ।
नुसतंच लिहिण्यापेक्षा, ती जगणं ।।
इतकं नाही सोपं, कविता पाठ करणं ।
नुसतंच पाठांतरापेक्षा ती अनुभवणं ।।
इतकं नाही सोपं, कविता म्हणणं ।
नुसतंच म्हणण्यापेक्षा, ती समजावणं ।।