शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यगीत व भक्तिगीत गायनासाठी प्रसिद्ध गायिका श्रीमती आशा खाडिलकर. त्यांनी प्रारंभीचे सांगीतिक शिक्षण कै. श्री. बाळकृष्णबुवा मोहिते यांचेकडून घेतले. लहान वयातच त्यांनी संगीत नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी आपल्या गायनाचा पहिला कार्यक्रम सादर केला. इ.स. १९७५ मध्ये लग्नानंतर मुंबईस स्थलांतर केल्यावर आशाताईंनी ख्यातनाम गायिका माणिक वर्मा यांच्याकडे गायनाचे शिक्षण चालू ठेवले. पुढच्या काळात त्या ग्वाल्हेर घराण्याचे समर्थ गायक पं. यशवंतबुवा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गायनकलेची आराधना करत होत्या. आशाताईंनी वेगवेगळ्या संगीत घराण्यांना आपल्या गायनात समाविष्ट करून त्यातून आपले गाणे अधिक कसदार बनविले आहे. किराणा घराणे, ग्वाल्हेर घराणे व आग्रा घराणे यांच्या गायन शैलीची अनेक वैशिष्ट्ये आशाताईंच्या गायनात दिसून येतात. त्यांनी पं. यशवंतबुवा जोशी, पंडिता पद्मावती शाळिग्राम, जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे अशा अनेक संगीताचार्यांचे मार्गदर्शन घेतले आहे.
नाट्यगीत, भक्तिगीत प्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर
Related articles