मना सज्जना भक्तिपंथेचि जावें ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वाभावें ।।
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें ।
जनी वंद्य ते सर्व भावें करावें ।।२।।
अर्थ : हे सज्जन मना, तू परमेश्वराचे स्मरण नित्य ठेऊन भक्तीने व्यवहार कर. त्यामुळे तुला सहजच श्रीकृष्ण प्रसन्न होतील. कृपा करतील. कारण तो त्यांचा स्वभावच आहे. मात्र तू सज्जन लोकांना जे आवडत नाही, निदनीय, चुकीचे वाटते तसे वागू नको व लोकदरास पात्र होणारे वंदनीय असे आचरण ठेव. भक्तिपंथ म्हणतात तो हाच.