- – कल्पेश वेदक / दशपदी कविता
घन गर्द काळोखी ही रात्र
मनी उद्विग्नता कालवते
कुणाची गफलत असूनी
अन् ही शिक्षा कुणास होते…
हर एक क्षणाच्या भवती
स्मृती त्या गुरफटलेल्या
इथे सुटका कुणाही नाही
तरी मन हे का बावरते…
ते ते प्रसंग अनुभवण्या
मन व्याकुळ व्याकुळ होई
प्रभाती आशेचा किरण तो
नवचैतन्याची ऊर्जा देते…