- – कविता / सविता टिळक /
मातृदिन आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जरी साजरा केला जात असेल, तरी प्रत्येक दिवस खरंतर आईचं ऋण मानण्याचा…
प्रत्येकाचं अस्तित्व आईमुळेच…
लाभला हा जन्म, ऋण तुझ्या कुशीचे।
मिळाले दान जगण्याचे , फळ तुझ्या व्रताचे।
पाजले बाळकडू शिस्तबद्ध जगण्याचे।
दाखवले मोल अविरत कष्टांचे।
दिली शिदोरी संस्कारी मनाची।
सांगितली महती माणुसकीची।
देऊन प्रेरणा, स्वयंसिद्ध होण्याची दाखवली वाट।
दिली शिकवण, यश झळाळे विनम्रतेच्या कोंदणात।
तुझ्या असण्याने लाभला जगण्याला अर्थ।
तू नसता वाटते जग हे सारे व्यर्थ।
स्मरेन शिकवण तुझी, विजयी होण्याची।
घेईन भरारी करण्या पूर्ती तुझ्या स्वप्नांची।