मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावें ।
मना बोलणे नीच सोशीत जावें ।।
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसी रे नीववावें ।।७।।
मना, तू संकटाने डगमगून जाऊ नकोस. तू नेहमी सर्व गुणातील श्रेष्ठ गुण जो धैर्य तो अंगीकार. दुसऱ्याने आपणांस अपमानकारक बोलले तरी ते सोसण्याचे धैर्य वाढव. आपण मात्र नेहमी नम्रतेनेच बोलावे असा संकल्प कर व आपल्या वागण्याने सर्व लोकांचे समाधान होईल, त्यांना संतोष वाटेल असे आचरण ठेव.