अटळ

योगिनी वैद्य / कविता

सतत सुख अनुभवले तरी त्याची आस संपत नाही
आनंदी असले मन तरी काळजी करणे थांबत नाही

आप्तेष्टांशिवाय जगण्याला पूर्णत्व येत नाही
आयुष्यभर जोडली नाती तरी एकटेपण टळत नाही

अडचणी येत राहिल्या म्हणून कष्ट करणे सोडून चालत नाही
कितीही प्रयत्न केले तरी विधिलिखित बदलता येत नाही

प्रत्येकालाच जे हवे असेल ते नेहमी मिळेल असे होत नाही
अमरत्वाची इच्छा बाळगली तरी मृत्यू टाळता येत नाही

काही घडणाऱ्या गोष्टी या असतातच अटळ
करायचा त्यांचा सामना एकवटून सारे बळ

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version