- मानसी बोडस / कविता / #MansiAdvait /
नितळ निळ्या पान्यामंदी रूप साजिरं,
चंद्र सूर्व्य आकाश तारं सारं माविलं।।
कुनी नदी, कुनी वढा, कसं ह्या तळी भरलं जळं।
आलं आलंया शेतात पीक, टच्च दाना, कनीस डोलं।।
हिरव्या राना, हिरवा पाला, गुराढोरांचा खुर्राक सारा।
धनी माझं शेतात राबं, काळ्या आईचा पदर भरं।।
पाऊस झाला मनाजोगा, इटुरायाचे आभार माना।
कर्जाचा डोंगर माथी जर आला, इटूरायावर भरोसा ठेवा।।
आषाढ मासी वारीची पारी, पाऊले म्हणती इट्टल हारी।
सावळा हरी सावळी माय सावळा भक्त गजर करी।।
टाळ मृदुंग धरी ठेका पायी, डोईवर तुळस हासत राही।
इट्टल मनी इट्टल जनीं सर्विकडे तो भरून वाही।।