रेला

पूरक, चक्र गतिशील आणि शीघ्र गतिक्षम बोलसमूहांची, तालाला अनुसरुन खाली-भरी तत्वानुसार बनलेली विस्तारक्षम रचना म्हणजे ‘रेला’.
रेला चौगुनीत तसेच आठगुनीत सुद्धा वाजविला जातो ज्याने रव निर्माण होते / एकसुरी नाद निर्माण होतो. रेल्यातील पहिले अक्षर स्वर असते व शेवटचे अक्षर व्यंजन असते. रेल्यातील पल्टे कायद्याप्रमाणेच विस्तारीत केले जातात आणि त्याचा शेवट तिहाईने होतो. रेल्याच्या रचनेत धिरधिर, घिडनग, तिरकीट या शब्दांचा वापर प्रामुख्याने होतो.

उदाहरण : ताल त्रिताल

धाsतीर किटतक धिरधिर किटतक
धाsतीर किटतक तूंना किटतक
ताsतीर किटतक तिरतिर किटतक
धाsतीर किटतक धिंना किटतक

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version